गोविंदपूर येथील डॉ. प्रतीक्षित घोगरे यांची पुणे जिल्हा परिषदेत पशुधन पर्यवेक्षकपदी निवड; आमदार कैलास पाटील यांच्याकडून सत्कार

Spread the love

धाराशिव : धाराशिव-कळंब मतदार संघातील गोविंदपूर (ता. कळंब) येथील युवक डॉ. प्रतीक्षित प्रदीप घोगरे यांनी आपल्या यशाची एक महत्त्वपूर्ण पायरी गाठली आहे. जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाच्या सरळसेवा भरती परीक्षा अंतर्गत त्यांची पुणे जिल्हा परिषदेत पशुधन पर्यवेक्षकपदी निवड झाली आहे.

या यशाबद्दल धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांनी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

या सत्कार प्रसंगी प्रवीन कोकाटे, शोकत शेख, समीर शेख, देवकते, अनंतराव घोगरे, दत्तप्रसाद घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!