मुंबई / लातूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – लातूर एक्सप्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बिदर एक्सप्रेसच्या रचनेत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दोन्ही गाड्यांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित (2AC), एक तृतीय वातानुकूलित (3AC) आणि एक शयनयान (Sleeper) डबा जोडण्यात येणार आहे.
यामुळे दोन्ही गाड्या आता २४ डब्यांसह धावतील. वाढीव डब्यांमुळे प्रवाशांना अधिक आरक्षण उपलब्ध होणार असून प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
लातूर एक्सप्रेससाठी नवीन रचना
गाडी क्रमांक 22107/22108 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस मध्ये २५ जून २०२६ पासून सुधारित रचना लागू होणार आहे.
बिदर एक्सप्रेससाठी नवीन रचना
गाडी क्रमांक 22143/22144 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस मध्ये २६ जून २०२६ (मुंबईहून) आणि २७ जून २०२६ (बिदरहून) पासून सुधारित रचना लागू होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या तिकिटांची स्थिती तपासून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे लातूर, धाराशिव आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
CSMT-Latur आणि CSMT-Bidar Express आता 24 डब्यांसह धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लातूर आणि बिदर एक्सप्रेसमध्ये प्रत्येकी 3 अतिरिक्त डबे जोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. दोन्ही गाड्या आता 24 डब्यांसह धावणार.