टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त ११० दात्यांचे रक्तदानाने अभिवादन
एक तेरा साथ ग्रुपचा यशस्वी पुढाकार

Spread the love


धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त एक तेरा साथ ग्रुपच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरामध्ये ११० दात्यांनी रक्तदान करून हजरत टिपू सुलतान यांना दि.२० नोव्हेंबर रोजी अभिवादन केले. दरम्यान, या ग्रुपच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे हे १४ वे वर्ष आहे.
धाराशिव शहरातील वैराग रोड फकीरा नगर येथे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एक तेरा साथ ग्रुपचे अध्यक्ष अहमद कुरेशी 
व मार्गदर्शक शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष शौकत शेख यांच्या
उपस्थितीत घेण्यात आले. प्रारंभी हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहमद कुरेशी, अलीम पठाण, मकबुल टकारी, जुबेर शेख, मुजाहिद कुरेशी, असलम कुरेशी, जुबेर कुरेशी, अलीम खान, आशिष कसबे, मुजकीर कुरेशी, अभिषेक, इर्शाद शेख, अमजद कुरेशी, अशोक नागटिळक, परमेश्वर वाघमारे, इफ्तेकार कुरेशी, शहानवाज कुरेशी, आरिफ सौदागर, मुजहिद कुरेशी, रणजीत एडके, आयान मोमीन, नितीन पेठे, बिलाल कुरेशी, निजाम कुरेशी, परमेश्वर पवार, जहीर पुरेशी, सुधीर गायकवाड, अविनाश मुळेकर, हैदर शेख, रॉबिन बगाडे आदींसह इतरांनी रक्तदान केले. तर रक्त संकलनाचे काम शासकीय‌ वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ विशाल नारायणकर, रक्तपेढी तंत्रज्ञ कांबळे, भेरे, कांबळे, जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंके, रक्तपेढी परिचर रविराज गंभीरे यांनी काम पाहिले. यावेळी एक तेरा साथ ग्रुपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‌


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!