ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद

Spread the love

ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद


तुळजापूर, प्रतिनिधी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचाराला धाराशिव जिल्ह्यात गती देण्यात येत आहे. याच अनुषंगाने डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी अणदूर आणि तुळजापूर परिसरातील ज्येष्ठ राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक आणि वकील बांधवांच्या भेटी घेऊन पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधला.
अणदूर येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते मधुकररावजी चव्हाण यांच्या निवासस्थानी डॉ. शिल्पा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि तरुणांच्या भविष्याबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नेते मधुकररावजी चव्हाण यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.
अणदूर येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी आणि प्राध्यापकवृंदाशी संवाद साधण्यात आला. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
तुळजापूर येथे श्री. उल्हासदादा बोरगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान प्रा. संभाजी भोसले, प्रा. ननवरे, प्रा. जोशी आणि प्रा. गोवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पदवीधरांच्या अपेक्षा, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळण्याची आवश्यकता यावर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
तसेच तुळजापूर न्यायालयातील वकील बांधवांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांची माहिती घेण्यात आली. अणदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. रामदादा आलुरे यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, पदवीधरांच्या समस्या आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा झाली.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील भैया पाटील, महेश कदम, शरद जगदाळे, अमोल पाटील, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रवी ठेंगल, लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, इंजिनिअरिंग सेलचे जिल्हाध्यक्ष सूरज वडवले, अजिंक्य हिबारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!