अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Spread the love




कळंब पोलीस ठाणे : पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. शेख यांच्या पथकाने कळंब पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 13.07.2026 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पोलीस निरीक्षक श्री. शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, कळंब येथील प्रभात लॉज मध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर 16.30 वा. छापा टाकला असता लॉज मध्ये दोन महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी नामे- समाधान महादेव कांबळे, रा. इंदीरानगर कळंब, अमोल राजाभाउ सोनटक्के वय 36 वर्षे, रा. हासेगाव ता. कळंब, नरेश खेमराज जोशी, रा बसस्थानक समोर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद दोघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने नमुद आरोपींना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, रोख रक्कम 6,200 व निरोधची पाकीट असा एकुण 16,200₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन आरोपी नामे- समाधान महादेव कांबळे, रा. इंदीरानगर कळंब, अमोल राजाभाउ सोनटक्के वय 36 वर्षे, रा. हासेगाव ता. कळंब, नरेश खेमराज जोशी, रा बसस्थानक समोर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचेविरुध्द गुरनं 298/2026 बी.एन.एस सह 143(3), 144(2), सह कलम 3, 4, 5, 6 मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात  दि. 13.07.2026 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शेख पोलीस ठाणे कळंबचे  पोलीस पथकाने केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!