धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी झाली आहे याबाबत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रसाद परमेश्वर वाघमारे, वय 33 वर्षे, रा. हाडोंग्री ता. भुम जि. धाराशिव यांचे हाडोंग्री येथील शेतातील घराचा मेन दरवाजा लोखंडी पाराने अज्ञात व्यक्तीने दि. 02.08.2026 रोजी 00.30 ते 0058 वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन फिर्यादी व सुनिता गणगे यांना सोने व पैसे कुठे आहेत ते सांगा नाहीतर तुम्हालाल जिवे ठार मारु अशी धमक देवून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1,60,000₹ किंमतीचे जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रसाद वाघमारे यांनी दि.07.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309(4), 331(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- स्वप्निल सुभाष चव्हाण, वय 34 वर्षे, रा. दयानंदनगर नळदुर्ग रोड तुळजापूर यांचे तुळजापूर खुर्द न. प. शाळेच्या जवळ तुळजापूर येथील सर्व्हेइंग ऑटो लेवल मशिन लेन्स असलेली केशरी व पांढरा पट्टा, एल ॲड टी डबल ड्रम रोलर मशीन मधील 70 लिटर डिझेल, केस रोलर मधील हायड्रोलीक ऑईल, सोनिक कंपनीचे 100 ए बॅटरी व एक्साईड कंपनीची 100 ए बॅटरी असे एकुण 66,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-स्वप्निल चव्हाण यांनी दि.07.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- प्रताप अजय शिवकर, वय 21 वर्षे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 65,000₹ किंमतीची बजाज प्लसर मोटरसायकल क्र एमएच 25 बीसी 8618 ही 31.07.2026 रोजी 23.30 वा. सु. ते दि. 01.08.2026 रोजी 04.30 वा. दरम्यान कोरेवस्ती केशेगाव फिर्यादीचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रताप शिवकर यांनी दि.07.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सविता राजेंद्र जाधव, वय 44 वर्षे, रा. वाळवणे ता. पारनेर ता. जि. अहिल्यानगर या व त्यांचे पती हे दि. 16.07.2026 रोजी 12.15 वा. सु. भुम बसस्थानक येथे बार्शी कडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सविता जाधव यांचे गळ्यातील 16.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1,40,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता जाधव यांनी दि.07.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.