तुळजापूर दिनांक 3 उपरोक्त विषयी विनंती की तुळजापूर येथे नगरपरिषदेच्या पाठीमागे सिटी सर्वे नंबर 972 ही लिंगायत समाजाची जंगम मठाची जागा हैदराबाद इंडोमेंट रेगुलेशन अॅक्ट १३४९ फसलीनुसार नोंदणीकृत झालेली धार्मिक संस्थेची जागा आहे शासनाने 1962 साली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ट्रस्ट केला मठाच्या 2364 चौ मी जागेपैकी 731 चौ मी वर जागेवर नगरपरिषदेने 57 वर्षांपूर्वी केवळ भाजी मंडईचे आरक्षण टाकून 1978 साली भूसंपादनाचा निवाडा व ताबा पावती कागदोपत्री केला या विरोधात ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या तहसीलदारानी शासनाशी पत्र व्यवहार करून त्यांच्या परस्पर झालेल्या या निर्णयास विरोध केला, नगर विकास मंत्रालयाने या विरोधाची दखल घेत नगरपालिकेच्या या निर्णयास 1976 साली स्थगिती दिली व निर्णय झाल्यानंतर ही 1978 1983 साली नगरपरिषदेच्या या कारवाईला नगरविकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे जंगम मठ ट्रस्टला भूसंपादन झाल्यानंतर प्रत्यक्ष सदरची रक्कम कधीही अदा करण्यात आली नाही ही वस्तुस्थिती आहे व परंपरागत या जागेचा ताबा प्रत्यक्षात आजतगायत ट्रस्टकडेच असून नगरपरिषदेने या जागेचा मालमत्ता कर आज पर्यंत वसूल केलेला आहे ट्रस्टची ताबा व मालकी मान्य करीत नगरपरिषदेने 1984 पासून सहा वेळा बांधकाम परवाना दिलेला आहे तसेच ट्रस्टची मालकी मान्य करत नगरपरिषदेने लेखी पत्र देऊन 1989 साली सार्वजनिक शौचालयासाठी 15 बाय 15 जागा ट्रस्टकडून घेतलेली आहे नगरपरिषदेने 1997 ते 2002 या काळात स्वतःहून सर्वानुमते विविध कायदेशीर ठराव घेऊन भाजीमंडईचे आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला व सर्व प्रक्रिया पूर्ण करत शासनाला नगर परिषदेकडून हा निर्णय कळविण्यात आला 2010 मध्ये झालेल्या तुळजापूर शहराच्या सुधारित विकास आराखड्यात (DP) या जागेचे आरक्षण वगळून ही जागा निम सार्वजनिक क्षेत्रात समाविष्ट केली व ट्रस्टकडे ही जागा कायम ठेवण्यात आली नगरपरिषदेने शासनाकडून विकास आराखडा मंजूर करून घेतला 2024- 2025 मध्ये नगरपरिषदेने संपूर्ण जागेत रीतसर मंजूर केलेल्या बांधकाम परवान्यानुसार या जागेत बांधकाम करण्यात आले असून उर्वरित जागेत महादेव मंदिर सभा मंडप व भाविकांसाठी भक्तनिवासाचे बांधकाम काम सुरू आहे या जागेचा वापर सार्वजनिक कार्यासाठी व भाविकांसाठी काशीपीठ जगदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या जागेतील बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथील जयकुमार नागनाथ पांढरे यांनी राजकीय सूड भावनेतून व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने दिलेल्या तक्रारी अर्जाची तात्काळ दखल घेत नगरपरिषदेने स्वतः घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ५० वर्षांपूर्वी झालेल्या कारवाईचा आधार घेत दिनांक १०-७-२०२६ रोजी तात्काळ सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन जंगम मठास बांधकाम बंद करण्याची नोटीस दिली आहे नगरपरिषदेची ही कारवाई रद्द करण्यात यावी अन्यथा समाजाच्या वतीने या अन्याय विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल मस्के महाबळेश्वर तोडकरी राजेंद्र मुंडे विश्वनाथ शेटे गुरुनाथ बडूरे धाराशिव येथील जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश पाळणे रवी कोरे आळणीकर,कैलास मस्के,भारत कोप्पा,विजय तोडकरी,आलोक नडमने, विशाल शेटे,अनिल बचाटे पवन कोरे,समाधान भोरे, राजेश बिराजदार,महेश उपासे श्रीकांत साखरे अनुप मस्के सुहास साखरे वीरभद्र बेलुरे एच व्ही भुसारे त्रंबक कपाळे वैजनाथ गुळवे नितीन मस्के आदी उपस्थित होते