धाराशिव : शहरातील जिजाऊ चौक, आर. पी. कॉलेज आणि भोसले हायस्कूल परिसरात सुरू असलेल्या बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.
रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, गती आणि सुरक्षिततेवर विशेष भर देत नागरिकांना दर्जेदार व सुकर वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणेला काम निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
यावेळी बोलताना, धाराशिवच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी प्रत्येक विकासकामावर सातत्याने लक्ष ठेवले जाईल आणि जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाची वाटचाल सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्षा सौ. नेहाताई काकडे, मुख्याधिकारी अंधारे मॅडम, सतीश दंडनाईक, अभिजित काकडे, पृथ्वीराज दंडनाईक, अभिजित पतंगे, अमित उंबरे तसेच परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#धाराशिव
#Dharashiv
#राणाजगजितसिंहपाटील
#बार्शीबोरफळरस्ता
#RoadDevelopment
#विकासकामे
#जनसंवाद
#Infrastructure
#SmartRoads
#महाराष्ट्र
#उस्मानाबादन्यूज
#धाराशिवन्यूज
#अंतरसंवादन्यूज
#MaharashtraNews
#DevelopmentWorks