SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी नागरिकांना अर्ज भरताना, आवश्यक कागदपत्रे सादर करताना तसेच मतदार यादीशी संबंधित प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या समस्यांवर तातडीने योग्य तो मार्ग काढून नागरिकांना दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राखून SIR प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी कटके तसेच सचिन पाटील यांच्याशीही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक सूचना व उपाययोजनांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, नगरसेवक खलिफा भाई कुरेशी, बबलू शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, पंकज भोसले, इस्माईल कुरेशी, अशोक देवकते, रोहित बागल, गणेश साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत बनसोडे, सुरज वडवले, अन्सार शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!