मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप

Spread the love


ईटकूर (ता. कळंब) : मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने ईटकूर (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मल्हार पाटील यांनी शाळेला भेट देत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना मल्हार पाटील म्हणाले, “शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने अशा विधायक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे.”
या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सौ. राजश्रीताई वरपे, अजित पिंगळे, जिल्हा परिषद सभापती विश्वास कोकणे, सदस्य अनंत लंगडे, तुषार शिंदे, दत्ता साळुंखे, अरुण चौधरी, प्रणव चव्हाण तसेच ईटकूर येथील प्रमुख कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत आनंद व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!