मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे

Spread the love







धाराशिव / प्रतिनिधी

मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे यांची निवड झाली आहे. परळी (वै.) येथील “शिक्षक भवन” सभागृहात रविवारी झालेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत ही निवड करण्यात आली.



या बैठकीत संघात कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांची फेरनिवड करण्यात आली. तर विद्यमान धाराशिव तालुकाध्यक्ष एस. के. दराडे यांना बढती देऊन  जिल्हा सचिवपदी  निवड करण्यात आली. निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक पी. एस. घाडगे, विद्यमान अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, नूतन कार्याध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, शिक्षक संघाचे आणि राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, शिक्षक संघाचे आणि राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे माजी सरचिटणीस व्ही.जी. पवार,  केंद्र कार्यकारिणी सदस्य, फारुख जमादार, सुशीलकुमार तीर्थकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष  जयपाल शेरखाने, जिल्हा कार्याध्यक्ष डी. के. भोसले, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!