सोन्याचे दर १७ हजार रुपयांनी कमी! दहा दिवसांत मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

Spread the love



सोन्याच्या दरात गेल्या दहा दिवसांत मोठी घसरण झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम तब्बल १७ हजार १२० रुपयांनी कमी झाला आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

११ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार ६८० रुपये होता. २१ नोव्हेंबर रोजी हा दर १ लाख २५ हजार ५६० रुपयांवर आला. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात १७ हजार १२० रुपयांची घट झाली आहे.

त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३० हजार ७९० रुपये होता. तो २१ नोव्हेंबर रोजी १ लाख १५ हजार ९० रुपये झाला. म्हणजेच २२ कॅरेट सोन्याच्या दरात १५ हजार ७०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.

सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे बाजारात ग्राहकांच्या खरेदीकडे लक्ष लागले आहे. लग्नसराई आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार, याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचे मूल्य आणि आर्थिक परिस्थिती यांचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो.

दहा दिवसांतील सोन्याच्या दरातील घसरण :
२४ कॅरेट – १७,१२० रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट – १५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम

#सोन्याचेदर #GoldRate #GoldPrice #GoldPriceToday #GoldMarket #PuneGoldRate #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #धाराशिव #महाराष्ट्रबातम्या #OsmanabadNews #AntarsanwadNews


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!