धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड

Spread the love

धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सौ. मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर यांनी गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी हे नियुक्तीपत्र अधिकृतपणे प्रदान केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉ.स्मिता शहापूरकर,माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विश्वासराव शिंदे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र शेरखाने , सय्यद खलील, शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्या सह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी, संविधानिक मूल्ये आणि पक्षाची लोककल्याणकारी धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे, महिला संघटना शहरात अधिक सक्षम व बहुआयामी करणे, तसेच पक्षश्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.या निवडीबद्दल सौ. मनीषा वाघमारे यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह, विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!