सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन

Spread the love


धाराशिव : धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगा तांडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर तब्बल सात दशकांपासून स्वस्त धान्य दुकानाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या अंबेजवळगा तांड्यावरील नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यापुढे रेशनसाठी दूरवर जावे लागणार नाही. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होणार असून शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ थेट गावातच मिळणार आहे.”

तांड्यावर स्वस्त धान्य दुकान सुरू झाल्याने नागरिकांना नियमित व सुलभ पद्धतीने शासकीय धान्य उपलब्ध होणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास सातपुते सर, नामदेव चव्हाण, सरपंच शशिकांत राठोड, रावसाहेब वाघमारे, शिवाजी पवार, आबा सरडे, जहागिरदारवाडीचे उपसरपंच अविनाश चव्हाण, नितीन कोळेकर, राजाभाऊ राठोड, सौ. सुमित्रा चव्हाण, सौ. आशा चव्हाण, अॅड. परमेश्वर चव्हाण, सुहास चव्हाण, बलभीम राठोड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!