Spread the love

एमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन

प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाची
जबाबदारी जिल्हा काँग्रेसने स्वीकारली

धाराशिव : प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएसी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाºया प्रथमेश देशमुख याने बुधवारी (दि. ९) पुण्यात आत्महत्या केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी (दि. ९) निधन झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १०) प्रथमेश यांच्या खासापुरी येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, कुटुंबीयांच्या पालनपोषणाची जबाबदारी धाराशिव जिल्हा काँग्रेस घेणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रथमेश परत येणार नाही, ही त्यांच्या कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना आहे. मात्र या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला एकटे पडू दिले जाणार नाही. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाच्या पुढील पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी धाराशिव जिल्हा काँग्रेसने स्वीकारली असून, कुटुंबाच्या सुख-दु:खात काँग्रेस सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही उमेश राजेनिंबाळकर यांनी दिली.

अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया प्रथमेश यांच्या दुर्दैवी निधनाची घटना अत्यंत वेदनादायी आहे. प्रथमेश यांच्या कुटुंबावर आलेले संकट हे खूप मोठे आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रथमेश यांच्या कुटुंबाची शेती मोठ्या प्रमाणात बाधित झाली होती. यावर्षीही पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीनसह उभी पिके करपली आहेत. एका बाजूला शेतीचे नुकसान, दुसºया बाजूला एमपीएससी परीक्षेत अत्यंत कमी फरकाने आलेले अपयश तसेच पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकारांबाबत निर्माण झालेली अस्वस्थता, अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींचा प्रथमेश यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी प्रथमेश यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दु:खात सहभागी होत काँग्रेसच्या वतीने त्यांना धीर दिला. प्रथमेश यांच्या निधनाने एका होतकरू तरुणाचे स्वप्न अधुरे राहिले असून, त्यांच्या स्मृतींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पारदर्शक, निष्पक्ष परीक्षा व्यवस्था हवी : राजेनिंबाळकर-
शेतकरी संकटात असताना त्यांना भक्कम आधार देणे आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह व निष्पक्ष परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र या दोन्ही पातळ्यांवर सरकारचे अपयश दिसून येत आहे. प्रथमेशसारख्या होतकरू तरुणांची स्वप्ने अशा परिस्थितीची बळी ठरू नयेत, यासाठी सरकारने संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!