मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार; आई तुळजाभवानीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक

Spread the love


तुळजापूर : महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे सहकुटुंब दर्शन घेत आदिशक्तीच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी तुळजाभवानी मातेचे विधीवत दर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार पार पाडले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

सचिन अहिर यांनी मंदिरात विधीवत पूजा-अर्चा व आरती करत महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. दर्शनानंतर मंदिर परिसरात उपस्थित शिवसैनिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

या प्रसंगी मा. तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी उपसभापती सचिन अहिर यांचे अभिनंदन करत त्यांना शाल, श्रीफळ आणि देवीची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले. राज्याच्या विधिमंडळातील महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे, अमरराजे कदम, ऋषीकेश मगर, सचिन रोचकरी, आबासाहेब कंदले, विशाल रोचकरी, औदुंबर कदम, मधुकर शेळके, शशिकांत पाटील, मंदिर प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसभापतींच्या तुळजापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने आवश्यक नियोजन केले होते. संपूर्ण दौरा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!