शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील १६.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँक शाखा किंवा ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर उपलब्ध असलेल्या यादीत आपले नाव तपासावे. त्यानंतर AgriStack (Farmer ID) नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.याशिवाय, एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या विशिष्ट ओळख क्रमांकाचा (Unique ID) वापर करून आवश्यक पडताळणी करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नाव तपासलेले नाही किंवा AgriStack नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!