भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले

Spread the love



भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी धाराशिव तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी तिलक वर्मा यांचे स्वागत करून श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी विधानपरिषदेचे आमदार श्री विक्रम काकडे हेही उपस्थित होते. मंदिर संस्थानतर्फे तिलक वर्मा यांना त्यांच्या आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने, अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!