भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार

Spread the love



धाराशिव : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ (नवी मुंबई) यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला भिकार सारोळा व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण ५०८ महिला, पुरुष आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग आदी विविध आजारांवर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक उपचार केले. तसेच रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले.
शिबिरादरम्यान गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या १३२ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यांच्यावर मुंबई येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी डॉ. अजित निळे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व औषधोपचार केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
यावेळी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष नीलकंठ पाटील, पंचायत समिती सदस्या शामल विशाल पाटील, हनुमंत लाकाळ, विजय हाऊळ, अमोल पाटील, अशोक लाकाळ, विशाल पाटील, श्रीमंत शेळके, बाबासाहेब लाकाळ, बापुराव तनमोर, पद्माकर घाडगे, बाळासाहेब पाटील, आगतराव लाकाळ, चंद्रसेन पुंड, शहाजी लाकाळ, श्रीमंत विश्वासे, फुलचंद लाकाळ तसेच भिकार सारोळा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#भिकारसारोळा #धाराशिव #धाराशिवतालुका #तेरणास्पेशालिटीहॉस्पिटल #आरोग्यशिबिर #मोफतआरोग्यतपासणी #आरोग्यसेवा #देवेंद्रफडणवीस #अजितदादापवार #महाराष्ट्र #उस्मानाबाद #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!