धाराशिव :
धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागाने आयोजित केलेल्या रिक्रुटमेंट कॅम्पस ड्राईव्ह मधून रिलायन्स लाइफ सायन्सेस मुंबई व
एजिओ फार्मसुटीकल पुणे या नामांकित फार्मा कंपन्यांमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तब्बल ४२ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने याने संगितले . या ड्राईव्ह साठी ८० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती . मुलाखतीची संपूर्ण प्रक्रिया कंपनीचे हेड एचआर श्री . विश्वनाथ पाटोळे ,श्री. गोपाळ पाटील ,श्री. राहुल आरे, श्री. नितीन कदम आणि श्री. संतोष स्वामी यांनी राबवली . मुलाखती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले कि या वर्षी भरपूर फार्मा कंपनी महाविद्यालयामध्ये कॅम्पस ड्राईव्ह साठी आल्या होत्या त्या मध्ये श्रेया लाइफ सायन्स , दास लॅब, हुमनीझ फार्मा , अँपोलो फार्म, टीसीएस, सिप्ला , ग्लॅक्सओ महाविद्यालयाची हि तिसरी बॅच बाहेर पडत असून दिवसेंगणिक महाविद्यालयाचे प्लेसमेंट मध्ये वाढ़ होताना दिसून येत आहे. महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षापासूनच ट्रेनिंग चे धडे दिले जातात.त्यामुळे शेवटच्या वर्षी जास्तीत जास्त फार्मसीची च्या विद्यार्थ्यांना फार्म कंपनी बरोबरच आयटी कंपनीत व शासकीय क्षेत्रात ही उच्च पदावर निवड होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे व उत्साहाचे वातावरण आहे.या ड्राईव्ह चे आयोजन प्रा. अशोक जगताप आणि डॉ. गुरुप्रसाद चिवटे सर यांनी केले होतें . निवड झालेले विद्यार्थी अकांक्षा वाघमारे,प्रेरणा घेडे,करुणा सुरवसे, प्रगती घुटे,ऋतुजा गोम्सले,शेख उजमा जलील,उकिरडे अमृता , रेकुलगे वैश्नवी , आर्ती राठोड,अमृत देशमुख, आकांक्षा माघेर,रचना जगताप ,निकिता ताकभाते ,ऋतुजा पुरी ,शेख रुही ,पठाण सना , झाल्टे नम्रता , मोईन खान पठाण ,विकास धुपे ,हार्दिक सोनवणे ,अभिषेक काळे , आश्रुबा कांबळे ,संतोष काळे ,निकिता भोरे ,विश्वजित भांगे ,पवनकुमार हेगडे ,अजित थेटे ,जमदाडे अजित ,हनुमान जोगदंड रोहित पवार ,शाम सत्वर , चंदन . तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय डॉ. पदमसिंह पाटील साहेब , संस्थेचे विश्वस्त माननीय आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब , माननीय श्री . मल्हार पाटील साहेब ,श्री. मेघ पाटील साहेब आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे सर, फार्मसी विभाग प्रमुख डॉ. प्रीती माने व सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थींचे अभिनंदन केले आहे .