तामलवाडी : तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला (गुटखा)ची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तामलवाडी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट मोटार कार क्रमांक MH-46-P-3471 अडवून तिची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) आढळून आला. पोलिसांनी ₹३,४१,२२०/- किमतीचा गुटखा जप्त केला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार , अंदाजे ₹५,००,०००/- किमतीची, जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण ₹८,४१,२२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे साहेब, पोउपनि प्रदीप टेकाळे,पोह 1523/ सुरज नरवडे,पोह/484 नितीन भोसले,पोना/1423 गोबडे,पोअ/311 सलगर यांचे पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
तामलवाडी पोलिसांनी नागरिकांना महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.