तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love



उमरगा : –  तुरोरी येथे आयोजित महिला संवाद मेळाव्यानिमित्त उपस्थित राहिलेल्या भाजपचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुरोरी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी व्यक्त केलेले प्रेम आणि विश्वास हे पुढील जनसेवेसाठी प्रेरणादायी असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आयोजित महिला संवाद मेळाव्यात त्यांनी महिलांशी मनमोकळा संवाद साधला. राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या विविध विकासकामांची तसेच महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
“विकास, विश्वास आणि जनसेवेच्या बळावर तुरोरीच्या प्रगतीला नवी गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी पूर्वीप्रमाणेच ठामपणे उभे राहावे. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर अधिक सक्षम, समृद्ध आणि विकासाभिमुख तुरोरी घडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आवाहनही मल्हार पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चनाताई जाधव, युवराज (दाजी) जाधव, संताजी चालुक्य पाटील, जिल्हा परिषद सभापती सिद्धेश्वर कोरे, सभापती बाबासाहेब खरसडे, जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, अप्पासाहेब पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


#तुरोरी #धाराशिव #महिला_संवाद_मेळावा #मल्हारराणाजगजितसिंहपाटील #भाजपा #महायुती #विकास #जनसंवाद #देवेंद्रफडणवीस #अंतरसंवादन्यूज #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!