आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रम

Spread the love

आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रम

धाराशिव : दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आगामी पेरणीच्या हंगामात मदत व्हावी, या उद्देशाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ढोकी येथे २५० शेतकरी बांधवांना मोफत ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. आगामी पेरणीच्या हंगामासाठी बियाण्यांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त मोठा उत्सव साजरा करण्याऐवजी गरजू शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे समाधान व्यक्त केले. वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या आगामी पेरणीसाठी हातभार लावणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हातात बियाणे देऊन त्यांच्या मनात नव्या हंगामाची आशा निर्माण करणे, ही वाढदिवसानिमित्त मिळणारी सर्वांत मोठी भेट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या संवेदनशील उपक्रमासाठी प्रमोद देशमुख आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी प्रमोद देशमुख, झुंबर बोडके, सिराज मुल्ला, गुणवंत (पापा) देशमुख, अण्णासाहेब देशमुख, गुणवंत सुतार, हरिभाऊ माळी, प्रभाकर गाढवे, प्रतीक पाटील, दौलत गाढवे, शहाजी कांबळे, अब्रार काजी, जब्बार सय्यद, इंझमाम काझी यांच्यासह परिसरातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!