खोटी ओळख सांगून विद्यार्थ्याची कागदपत्रे घेतल्याचा आरोप; उमरगा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Spread the love


उमरगा | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील सी.बी.एस.ई. संलग्न डॉ. के. डी. शेंडगे स्कूलमधून एका विद्यार्थ्याची महत्त्वाची मूळ शालेय कागदपत्रे खोटी ओळख सांगून घेतल्याप्रकरणी एका महिलेसह इतरांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा उर्फ गौरी धैर्यशील पाटील (जगताप) (वय २५, रा. भांतागळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) हिने फिर्यादी हिराजी तुळशिराम गायकवाड (वय ५२, रा. दापका, ता. उमरगा) यांच्या विभक्त राहत असलेल्या पत्नी व तिच्या नातेवाईकांसोबत संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, ४ मार्च २०२३ रोजी संबंधित महिला उमरगा येथील डॉ. के. डी. शेंडगे सी.बी.एस.ई. स्कूलमध्ये जाऊन “मीच विद्यार्थ्याची आई आहे” अशी खोटी माहिती देत विद्यार्थ्याची महत्त्वाची मूळ शालेय कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तसेच धाकदपटशा दाखवून पैसे व मालमत्ता उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात उमरगा न्यायालय क्रमांक १ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर, ४ जुलै २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९, ४२०, ३८३, ४६३, ४६४, ४६८, ३४ व १२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!