परांडा तालुक्यातील जवळा-आसू-लोणी रस्त्यासाठी ३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love



परंडा : तालुक्यातील दळणवळण आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जवळा-आसू-लोणी या रस्त्याच्या कामासाठी ‘केंद्रीय मार्ग निधी’ (CRIF) अंतर्गत तब्बल ३ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये परंडा तालुक्यातील राज्य महामार्ग ६८ (SH 68) ते लोणी (किमी ६३/६०० ते ७०/६००) या टप्प्यातील रस्त्याचे काम केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी भूम परंडा वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या विशेष प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून, शासनाकडून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामामुळे जवळा, आसू, लोणीसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची आणि नागरिकांची वाहतुकीची मोठी गैरसोय दूर होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!