केशेगावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Spread the love


धाराशिव | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे उबाठा शिवसेनेचे युवा कार्यकर्ते तथा शिवा संघटना तालुकाध्यक्ष श्री. चन्नाप्पा बाबुराव साखरे आणि केशेगावचे माजी उपसरपंच श्री. दयानंद जळकोटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी धोरणांवर विश्वास व्यक्त करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे केशेगाव परिसरात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, शहापूर भाजप गटप्रमुख मल्लिनाथ गावडे, रामराजे बंडगर, शिव हुकीरे, पद्माकर जेवळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Dharashiv #Tuljapur #Keshgaon #BJP #RanaJagjitsinhPatil #MaharashtraPolitics #OsmanabadNews #धाराशिव #तुळजापूर #केशेगाव #भाजप #राणाजगजितसिंहपाटील #राजकारण #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!