तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना – धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय?

Spread the love

धाराशिव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील घटना
दि. 21 मे रोजी रात्री 2.45 ते 3.00 च्या सुमारास केशेगाव येथील सोमनाथ भिमराव वाघाळे यांच्या घराचे कुलूप तोडून आरोपी सतिष कमलाकर गिरी (रा. विठ्ठलवाडी) याने 17 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹67,000 किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भा.दं.वि. कलम 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरुम पोलीस ठाणे हद्दीतील घटना
दि. 10 जून रोजी दुपारी 2 च्या सुमारास भुयार चिंचोली येथील शुभम शाहुराज लोंढे यांची हिरो एचएफ (क्र. MH25 AU 4059) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मोटारसायकलची किंमत सुमारे ₹25,000 असून, या प्रकरणी कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना
दि. 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भानुनगर येथील जितेंद्र पोपट नाईकवाडी यांची हिरो स्प्लेंडर (क्र. MH25 Z 1220) ही मोटारसायकल आरपी कॉलेजजवळून चोरीस गेली. या मोटारसायकलची किंमत अंदाजे ₹30,000 असून, या प्रकरणातही कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीनही घटनांची चौकशी संबंधित पोलीस ठाण्यांतून सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!