खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
धाराशिव : दि.10/06/2026 रोजी पोलीस ठाणे आंबी गुरण ९३/२६ कलम 103 (1), 3 (5) BNS प्रमाणे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खुनाचे प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार असून नमूद फरार आरोपी नामे दीपक विक्रम गरड रा. चिंचपूर खुर्द ता. परंडा जि. धाराशिव हा बसवकल्याण, राज्य कर्नाटक येथे आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. रितू खोखर मॅडम व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बसवकल्याण राज्य कर्नाटक येथे माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन नमूद आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पथकाने अतिशय शीताफिने त्याचा पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेऊन त्याला पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलीस ठाणे आंबी येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार गुन्हे शाखा धाराशिव सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार/ विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चापोअ/रोहित दंडनाईक यांचे पथकाने केली आहे