अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Spread the love

 धाराशिव : पोलीस अधीक्षक रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल मोहिते (परि.पोलीस उपअधीक्षक) यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाराशिव शहरातील ओरा(Aura )स्पा सेंटरवर आज दि. ०२/०६/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये श्री. अमोल मोहिते (परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक), पोलीस निरीक्षक श्री. एम. एन. शेळके(AHTU), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस अंमलदार माने, दूधभाते, कंदळे,नाईकवडी,किवंडे,केवके महिला पोलीस हवालदार पुरी, जाधव तसेच चालक यांनी सहभाग घेतला. सदर कारवाई दरम्यान पंटरचा वापर करून खात्री करण्यात आली आणि शासकीय पंचांसमक्ष छापा टाकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

 कारवाईदरम्यान सदर स्पा सेंटरमध्ये व्यावसायिक लैंगिक शोषण (अनैतिक व्यापार) सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित व्यवस्थापक, चालक व इतर संबंधित आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये एकूण ५ महिलांची सुटका (Rescue) करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात येत आहे.

           अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष मोहीम राबविण्यात येत असून, याची विशेष जबाबदारी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याअंतर्गत बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर कडक पाळत ठेवून तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ही धडक मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरू राहील आणि अवैध व्यवसायांत सामील असलेल्या घटकांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!