धाराशिव, दि. 13 : लग्न लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करून नंतर 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज संग्राम पाटील (वय 28, मूळ रा. सुंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड, सध्या रा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय निवासस्थान, भाग्यनगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींनी 13 मे 2026 ते 11 जून 2026 या कालावधीत फिर्यादीची लग्नाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर फिर्यादीच्या घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने (किंमत 25 लाख 84 हजार रुपये) व 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 27 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल अप्रामाणिकपणे घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच फिर्यादीची प्रतिमा मलीन करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी महेश जनार्धन पाटील, नवीनकुमार मारुतीराव पाटील, सुंदरबाई गंगाधर पाटील, शंकर नागोराव खपाटे, शुभांगी उर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले, शिवम खरबुजे, गोरखनाथ वारले, जालिंदरनाथ वारले व शुभम वारले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(2), 308(5), 308(6), 318(4), 303(2), 352, 351(2), 61(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#धाराशिव #धाराशिवन्यूज #उस्मानाबाद #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज #खंडणी #फसवणूक #CrimeNews #DharashivNews #OsmanabadNews #ExtortionCase #FraudCase #MaharashtraNews #AntarsanwadNews #PoliceCase #CrimeUpdate #DharashivPolice #OsmanabadCrime #BreakingNews #MaharashtraCrimeNews