धाराशिव | अंतरसंवाद न्यूज
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ नुसार शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची प्रक्रिया, शिजवणे, साठवण आणि तयारी या सर्व टप्प्यांवर वेगळी ठेवणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द करणे, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, शाकाहारी अन्नपदार्थ मांसाहारी अन्नपदार्थांपासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या पातळीवर स्पष्टपणे वेगळे ठेवले गेले पाहिजेत. अन्न सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तातडीने कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.