धाराशिव-तुळजापूर हायवेवर भीषण अपघात; रिक्षाचालक ठार

Spread the love

धाराशिव :
धाराशिव ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आज (शनिवार) २३ आगस्ट रोजी सायंकाळी तेरणा अभियांत्रिकी कॉलेजजवळील पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात वडगाव सिद्धेश्वर (ता.जि. धाराशिव) येथील रिक्षा चालक प्रदीप बुबासाहेब हजारे (वय अंदाजे 35) यांचा मृत्यू झाला.

सदरील अपघाताची माहिती अशी की, धाराशिववरून तुळजापूरकडे जाणाऱ्या हायवेवर चुकीच्या पद्धतीने मालवाहतूक ट्रक (क्रमांक KA-56-9349) रस्त्यावर उभा होता. या ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या प्रवासी रिक्षा (क्रमांक MH-25-K-2704) ची जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की रिक्षा ट्रकच्या खाली अक्षरशः अडकून पडली. अशी माहिती प्राथमिक आहे.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रिक्षा ओढून बाहेर काढली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालक प्रदीप हजारे यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय (सीव्हिल हॉस्पिटल) धाराशिव येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डोक्याला गंभीर मार लागून मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मृत रिक्षा चालक प्रदीप हजारे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि अवघ्या एका वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वडगाव सिद्धेश्वरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंखे यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!