प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love



कळंब : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत तालीम फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी नगर परिषद शाळा क्रमांक १ कळंब या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ७७ डझन रजिस्टर वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. अतिशय चांगल्या दर्जाचे प्रत्येक विद्यार्थ्यांना अर्धा डझन रजिस्टर याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून शिक्षणासाठी नवी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब नपचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती लखन गायकवाड हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी “शिक्षण हाच सशक्त राष्ट्रनिर्मितीचा पाया असून विद्यार्थ्यांना योग्य साधने उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हर्षद अंबुरे (नगरसेवक, कळंब), मुस्तान मिर्झा (बीबीसी न्यूज), शीतलकुमार घोंगडे,(दै.दिव्य मराठी),अकीबजी पटेल (संपादक सा.नवमत) आदी मान्यवर उपस्थित होते. नगर परिषद शाळेमध्ये फक्त गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुले शिकतात म्हणूनच या शाळेची निवड केल्याचे अकिब पटेल यांनी त्यांच्या मनोगतात नमूद केले.
या कार्यक्रमासाठी तालीम फाउंडेशन कळंबचे अकिब पटेल,मुजम्मील पटेल, आवेज पठाण, जफर शेख,इम्रान पठाण, निजाम शेख,तनवीर शेख आदी सदस्य उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी तालीम फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेजा पायाळ यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
अविनाश खरडकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रदीप सर्जे यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी
नारायण बाकले, संतोष पवळ, युसुफ खान पठाण, दशरथ नाथाडे, महादेवी झाडे, सुदामती गरड यांनी विशेष परिश्रम घेतले.
तालीम फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!