कळंब – समाजकार्य व सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या अमन भाई शेख यांची वंचित बहुजन आघाडीच्या कळंब शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गेल्या ७–८ वर्षांपासून तालुका अध्यक्ष कुणाल दादा मस्के यांचे निष्ठावान सहकारी म्हणून समाजकार्यात सक्रिय योगदान दिले आहे.
अमन भाईंचा जनतेशी असलेला जवळचा संपर्क, सेवाभाव आणि समाजहिताची जिद्द लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला आगामी नगरपालिका निवडणुकीत मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
एहसास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असलेले अमन भाई शेख, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवतील, अशी अपेक्षा आहे. ही नियुक्ती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवीन उमेद निर्माण करणारी ठरेल.