धाराशिव तालुक्यातील २ ठिकाणी अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल व्यापारी कधी पकडणार?

Spread the love

धाराशिव तालुक्यातील २ ठिकाणी अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बेंबळी पोलीस ठाणे आदी मध्ये एक जनावर कारवाई करण्यात आली आहे तर एक जनावर कारवाई करण्यात आली आहे.



बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-हुसेन दगडु औटे, वय 50 वर्षे, आनंद सुभाष सपाटे, वय 38 वर्षे, दोघे रा. केशेगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.31.10.2025 रोजी 19.20 वा. सु.केशेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोस्ती पान शॉपमध्ये महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ डायरेक्टर पान मसाला, बादशाहा गुटखा, विमल पान मसाला, व्ही1 तंबाखु चे पुडा असा एकुण 6,580 ₹ किंमतीचे विक्री  करीता जवळ बाळगुन विक्री करत असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम- 123,223, 274, 275,3(5) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-मुब्बशीर नासेर सय्यद, वय 24 वर्षे, सुयश सुनिल वाघमारे, वय 32 वर्षे,  दोघे रा. सांळुके नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.30.10.2025 रोजी 17.10 वा. सु.होळकर चौक धाराशिव येथे महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व बादशाहा गुटखा, विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखु सह हिरो होंडा मोटरसायकल असे एकुण 44,750 ₹ किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगुन विक्री करत असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम- 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा मानके कायदा  कलम 59 अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव शहरात पोलिसांनी गुटखा विक्री करणारा वरून कारवाई केली आहे याचे कौतुकच आहे पण गुटखा होलसेल व्यापारी (मोठे मासे) कधी पकडणार त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!