भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश!

Spread the love

प्रभाग क्रमांक 3 मधून पुरस्कृत उमेदवारी जाहीर**

धाराशिव — भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश केला असून प्रभाग क्रमांक 3 साठी पक्षाने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

या वेळी पक्षाचे पूर्वीचे अधिकृत उमेदवार अक्षय साळुंखे यांनी पक्षहिताला प्राधान्य देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि विलास अण्णा सांजेकर यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी भक्कम झाली आहे.

विलास अण्णा सांजेकर यांचे मनोगत

“अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले, परंतु न्याय मिळाला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये मला सन्मान आणि योग्य न्याय मिळाला,” असे सांगून त्यांनी पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.

मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

विलास अण्णा सांजेकर यांच्या सोबत पुढील मान्यवर व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाः
अण्णासाहेब गायकवाड, अजय सूर्यवंशी, सुजित पवार, सुनील शेळके, उमाकांत आप्पा पवार, प्रशांत पोतदार, पंकज सोनटक्के, सुजित गायकवाड, हर्षल वाघमारे, सिद्धांत सोनवणे, रुकेश पाटील, मंगेश नाईक, वैभव कोंडेकर, शुभम शिंदे, राहुल चौरे, सोमनाथ लोहार, आकाश गोरे, सिद्धार्थ गायकवाड, दिनेश मिटकरी, अमित पोतदार, अखलाख शेख, शंभु शेरकर, दिपक कोकाटे, शरद सोनवणे, सुमित गायकवाड, यश कांबळे, आदित्य गायकवाड, मानव सांजेकर, राज पाटील, स्वप्नील बनसोडे, शोएब खान, मोईज अन्सारी, मिलिंद आदटराव, अमन शेख, अक्षय डुकरे, सागर झोंबाडे, आशिष तडवळकर, श्रीकांत जगदाळे आणि भूषण माने.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर

या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख,माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी,डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे,नगरसेवक बाबा मुजावर,अण्णा गायकवाड,अमोल सुरवसे, उपाध्यक्ष जयंत देशमुख,ॲड. योगेश सोन्ने पाटील, ॲड.अविनाश जाधव,रवि ठेंगील यांसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढली

विलास अण्णा सांजेकर यांचा प्रवेश हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड आणखी वेगवान करणारा ठरला असून स्थानिक राजकारणात बदलाची दिशा स्पष्ट दिसू लागली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!