धाराशिव : शिंगोलीच्या विद्यानिकेतन माध्यमिक व आदर्श प्राथमिक आश्रमशाळेत प्राथमिकचे मुख्याध्यापक सतिश कुंभार सरांनी दहा नारळाचे व आकरा शेवग्याची रोपे शाळेत परसबाग तयार करण्यासाठी भेट दिली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून शाळेत परसबाग तयार केली. त्यात नारळ,शेवगा व कडीपत्ता रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला माध्यमिकचे मुख्याध्यापक आण्णासाहेब चव्हाण, शाळेतील जेष्ठ शिक्षक रत्नाकर पाटील,चंद्रकांत जाधव,दिपक खबोले,सुधीर कांबळे, खंडू पडवळ तसेच कैलास शानिमे,मल्लिनाथ कोणदे,विशाल राठोड,इरफान शेख व शिक्षकेत्तर कर्मचारी रेवा चव्हाण,गोविंद बनसोडे, सागर सुर्यवंशी,वसंत भिसे,अविनाश घोडके व शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.