तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला

Spread the love

तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला

तुळजापूर : शहरातील जामा मस्जिद परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत उपवास सोडला.

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून शुक्रवारच्या दिवशी तुळजापूर शहरातील जामा मस्जिद येथे शिवसेनेच्या वतीने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारची फळे व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी मुस्लिम बांधवांसोबत शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकत्र येत उपवास सोडला तसेच आगामी रमजान ईदच्या शुभेच्छा देत सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. या कार्यक्रमामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश समाजाला देण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शहर संघटक नितीन मस्के, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, संजय लोंढे, बाळू भय्ये यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानण्यात आले. तसेच अशा उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव आणि ऐक्य अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!