धाराशिव 4 :श्रमिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव यांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार 5 जानेवारी रोजी होणार आहे.या उद्घघाटन समारंभास नागरिकांनी व श्रमिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव यांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता रमाई सदन, शिवाजी नगर सांजा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन समारंभास मा. श्री. अंकुश कृष्णाजी भालेराव यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी अनिता आनंद भालेराव तर उपाध्यक्षपदी शाहीन जाकेर शेख कार्यरत आहेत. संस्थेच्या संचालक मंडळात सुवर्णा जवाहर कांबळे, महादेवी बाळासाहेब माळी, शैला प्रमोद दसपुते, सोनाली किरण नेटके, छाया हनुमंत मुठाळ, वैशाली अमोल शिंदे, कविता नीलम चंदनशिवे, अंजली आनंद भालेराव, सविता धनंजय बनसोडे यांचा समावेश आहे.
स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य) व युनिक बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे ए. ए. भालेराव हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत., या उद्घाटन समारंभास नागरिकांनी व श्रमिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.