धाराशिव –
खरीप २०२० हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे. आपल्या महायुती सरकारने १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये इतका निधी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. मा . सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होत्या. याविरोधात आपण शेतकरी बांधवांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने २४ नोव्हेंबर २०२५ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, विमा कंपनीचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. याच आदेशाची अंमलबजावणी करत, आपल्या महायुती सरकारने बुधवार ११ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यासाठी १३४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. १३४.११ कोटींचा हा निधी कृषी आयुक्तालयाच्या ESCROW बँक खात्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांना वर्ग केला जाणार आहे.
बजाज अलियांज विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेले ७५ कोटी रुपये आणि त्यावरील व्याजही पात्र शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी वापरले जाणार आहे. त्याची सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे. त्याकडेही आपले लक्ष असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच आहे. मागील पाच वर्षांपासून आपण शेतकरी बांधवांच्या सोबतीने सलग जिल्हा प्रशासनाकडे आणि न्यायालयात पाठपुरावा करत होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही विमा कंपनीची याचिका फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविम्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता प्रत्यक्ष निधी वर्ग करण्याचा शासन निर्णय निघाल्याने हजारो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
- (no title)Spread the loveएमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाचीजबाबदारी जिल्हा काँग्रेसने स्वीकारली धाराशिव : प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएसी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाºया प्रथमेश देशमुख याने बुधवारी (दि. ९) पुण्यात आत्महत्या केली. काँग्रेसचे…
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवाSpread the love धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करून अल्लाहकडे दुवा करण्यात आली. ईदगाह कमिटीच्या…
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाकSpread the loveवाशी : वाशी तालुक्यात तब्बल ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली सोयाबीनची पिके सुकून करपली आहेत. डोळ्यादेखत उभे पीक जळून जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, पिकांसोबतच शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेली उत्पन्नाची आशाही जळून खाक झाली आहे.जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती.…
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणीSpread the loveपावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी धाराशिव ता2: मराठवाड्यातील आकांक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. यामुळं सोयाबीन या मुख्य पिकांसह इतर खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अशा सर्व भागातील पिकांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा… - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णीSpread the love धाराशिव, दि. २९ ऑगस्ट २०२६ : श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक तसेच शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली, सभेस धाराशिव च्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये संस्थेच्या ठेवी, कर्ज…