धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

Spread the love

धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवा

नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-सुर्यकांत मारुती लवटे, रा. येवती ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.23.12.2025 रोजी 15.00 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 5,100 ₹ किंमतीची 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-अकाबाई नागनाथ काळे, वय 40 वर्षे, रा. कृष्णा नगर बार्शी नाका धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.24.12.2025 रोजी 11.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर कृष्णा नगर बार्शी नाका धाराशिव येथे अंदाजे 6,700 ₹ किंमतीची 115 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.

लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-शाहुराज विश्वनाथ सोनवणे, वय 75 वर्षे, रा.  नागुर लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.24.12.2025 रोजी 15.20 वा. सु. आपल्या राहत्या पत्र्याचे शेड समोर अंदाजे 1,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.

वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-महिंद्र दत्तु गाडे, वय 55 वर्षे, रा. पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.24.12.2025 रोजी 18.15 वा. सु. पिंपळगाव लिंगी येथे आपल्या शेडसमोर अंदाजे 1,700 ₹ किंमतीची 17 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.

 

तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-समाधान वसंत नवगिरे, वय 35 वर्षे, रा. देवकुरुळी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.24.12.2025 रोजी 19.30 वा. सु. देवकुरुळी ते काटगाव जाणारे रोडचे बाजूस ऑटेल सरपंच च्या बाजूला मोकळ्या जागेत अंदाजे 1,900 ₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.

कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-अनिता पिंटु शिंदे, वय 30 वर्षे, रा. भोगजी ता.कळंब जि. धाराशिव या दि.24.12.2025 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहत्या घराचे बाजूस अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.

अशी माहिती पोलिस माहिती कार्यालय कडून देण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!