क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.

Spread the love

क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.

मुंबई, : कर्करोगावर मात करणारा आणि लोकहितैषी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या YouWeCan फाउंडेशनने शाओमी इंडियाच्या पाठबळाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ‘स्वस्थ महिला स्वस्थ भारत’ प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडला ज्यात 10,000 महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली व त्यायोगे महाराष्ट्रातील वंचित भागांतील महिलांसाठी या आजाराचे लवकर निदान करणारी यंत्रणा व आरोग्यसेवेची उपलब्धता यांना अधिक दृढ करण्यात आली. या मोहिमेला मिळालेल्या यशामुळे कार्यक्रमाच्या दुस-या टप्प्याचाही शुभारंभ करण्यात आला¸ ज्यामध्ये या प्रांतातील 4,000 हून अधिक स्त्रियांची तपासणी करण्याचे फाउंडेशनचे लक्ष्य आहे व यापैकी 3,000 महिलांची तपासणी आधीच पूर्ण झाली आहे. 

समुदायापर्यंत पोहोचण्याच्या व तपासणी शिबिरे आयोजित करण्याच्या संरचित पद्धतीच्या माध्यमातून या उपक्रमाने स्क्रिनिंग झालेल्या महिलांसह 17,000 हून अधिक महिलांना स्तनांच्या आरोग्याबद्दल जागरुकतेचे आणि स्तनांच्या स्व-तपासणीच्या पद्धतीचे थेट शिक्षण दिले. कार्यक्रमामधून 117 संशयित प्रकरणे शोधली गेली, त्यांना समुपदेशन व निदानात्मक फॉलो-अप मिळेल याची काळजी घेतली गेली, परिणामी ब्रेस्ट कॅन्सरच्या एका केसचे निश्चित निदान झाले. 

स्वस्थ महिला स्वस्थ भारत कार्यक्रमाच्या उद्दीष्टांना अधोरेखित करताना श्री. युवराज सिंग म्हणाले, “भारतामध्ये बेस्ट कॅन्सरचे परिणाम हे बरेचदा उपचारांच्या अभावामुळे नाही तर आजाराचे किती उशीराने निदान झाले यानुसार होतात. जागरुकता, स्क्रिनिंगची सुविधा व फॉलो-अप या गोष्टी निदानातील विलंबाचा सर्वाधिक धोका असलेल्या स्त्रियांच्या अधिक निकट आणून ही परिस्थिती बदलण्याच्या हेतूने ‘स्वस्थ महिला स्वस्थ भारत’ची निर्मिती करण्यात आली होती. सामुदायिक सहभागाला तंत्रज्ञान-सुसज्ज तपासणी सुविधा व तळागाळातील घटकांशी केलेल्या भक्कम भागीदारी यांची जोड देत, आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्याविषयीच्या चर्चांना सर्वसामान्य आयुष्याचा भाग बनविण्यासाठी तसेच लवकरात लवकर व आत्मविश्वासपूर्ण कृती शक्य व्हावी यासाठी काम करत आहोत. कार्यक्रमाची व्याप्ती, देखभालीतील सातत्य आणि दीर्घकालीन सार्वजनिक आरोग्यावरील परिणामांना पाठबळ देणा-या यंत्रणा उभारणे यावर आम्ही नेहमीच आपले लक्ष केंद्रित केले आहे.”

2024 साली सुरू झालेला ‘स्वस्थ महिला स्वस्थ भारत’ कार्यक्रमाची संकल्पना एक व्यापक स्तरावर राबविला जाणारा प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रम म्हणून तयार करण्यात आली¸ ज्याचा हेतू जागरुकतेची कमतरता, सामाजिक लांच्छनाची भावना व तपासणीच्या सुविधेची मर्यादित उपलब्धता यांच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानास होणा-या विलंबाची समस्या हाताळणे हा होता. YouWeCan फाउंडेशनने शाओमी इंडियाच्या पाठबळाने 15 राज्यांतील 15 इच्छुक जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या या उपक्रमामध्ये जिथे आरोग्यसेवेचे निर्देशांक नेहमीच राष्ट्रीय सरासरीच्या खाली असतात अशा प्रांतांवर लक्ष केंद्रित करण्यात आले व संस्थेच्या समाजोपयोगी सीएसआर उपक्रमांतील गुंतवणूक सर्वाधिक गरज असलेल्या समुदायांना मिळेल¸ याची खातरजमा केली गेली. 

राष्ट्रीय स्तरावर या कार्यक्रमाने आजच्या तारखेपर्यंत 5,00,000 हून अधिक लोकांना स्तनांचे आरोय व स्वयं-तपासणीचे महत्त्व याविषयी शिक्षित केले आहे, 2,00,000 हून अधिक महिलांची तपासणी केली आहे, 2,700 हून अधिक संशयित प्रकरणे ओळखली आहेत व ब्रेस्ट कॅन्सरच्या 13 प्रकरणांचे निश्चित निदान करतानाच, त्यांना वेळीच योग्य डॉक्टरकडे पाठविले जाईल आणि त्यांना सातत्याने देखभाल मिळत राहील याची काळजी घेतली आहे.

पहिल्या टप्प्याचा सखोल परिणाम व त्यातून गिरविलेले धडे याआधारे YouWeCan फाउंडेशनने ‘स्वस्थ महिला स्वस्थ भारत’ मोहिमेच्या फेज 2.0ची घोषणा केली आहे. या दुस-या टप्प्यामध्ये तपासण्यांचा आवाका विस्तारण्यावर, समुदायांना अधिक खोलवर जात सहभागी करून घेण्यावर आणि दीर्घकालीन शाश्वतता व व्यापक पोहोच यांची खातरजमा करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांशी अधिक भक्कमपणे हातमिळवणी करण्यावर भर दिला जाईल.

कार्यक्रमाला पाठबळ देणारी भागीदार कंपनी या नात्याने शाओमी इंडियाने तंत्रज्ञान-सुसज्ज स्क्रिनिंग उपाययोजना तैनात करण्यास मदत केली, तळागाळाच्या स्तरावर क्षमता उभारणीला पाठिंबा दिला आणि विविध प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांत जागरुकतेच्या प्रयोगांचा आवाका वाढविला. कॉर्पोरेट कंपन्यांनी जबाबदारीने घेतलेला सहभाग सरकारी आरोग्यसेवा प्राधान्यक्रमांशी कशाप्रकारे पूरक ठरू शकतो व त्यातून मोजता येण्याजोग्या सार्वजनिक आरोग्य परिणामांना कशाप्रकारे चालना मिळू शकते¸ हे यातून दिसून आले.

शाओमी इंडियाचे सीओओ श्री. सुधिन माथूर म्हणाले, “तंत्रज्ञानाने फक्त नवसंकल्पना राबविण्याच्या पलीकडे जात काहीतरी अधिक केले पाहिजे – त्याने खरोखरीचा, अर्थपूर्ण परिणाम साधला पाहिजे असे AI शाओमी इंडियामध्ये आम्हाला ठामपणे वाटते. जागरुकता आणि कृती यांच्यातील दरी सांधण्याप्रती आपल्या कटिबद्धतेची आम्ही पुन्हा एकदा खात्री देत आहोत. YouWeCan फाउंडेशनशी केलेल्या भागीदारीतून राबविण्यात येणा-या आमच्या ‘स्वस्थ महिला स्वस्थ भारत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही महिलांना अत्यावश्यक ज्ञान व आजाराचे लवकर निदान करण्याची साधने देत सक्षम करण्यासाठी नवसंकल्पना, व्याप्ती व भागीदारी यांचा वापर करत आहोत. आतापर्यंत 4 लाख महिलांचे सक्षमीकरण करणा-या व 2 लाखांहून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करणा-या या उपक्रमामध्ये तंत्रज्ञान, हेतू व व्याप्ती या गोष्टी एकत्र येऊन वेळच्या वेळी हस्तक्षेप व प्रत्यक्ष सामाजिक बदल कशाप्रकारे साध्य होऊ शकतात याचे प्रतिबिंब दिसू शकते. भारतामध्ये खोलवर मूळे रुजविलेला एक ब्रॅण्ड या नात्याने आम्ही सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी परिणाम घडवून आणण्याच्या प्रक्रियेला गती देण्याशी तसेच देशभरात अधिक निरोगी, भक्कम समुदायांना पाठबळ देण्याशी कटिबद्ध आहोत.”

निव्वळ आकडेवारीच्या पलिकडे जाणारे परिणाम घडवून आणत या उपक्रमाने ब्रेस्ट कॅन्सरशी जोडलेली भीतीची भावना कमी करत दीर्घकालीन सामाजिक प्रभाव निर्माण करण्यात, आरोग्यविषयक चर्चांना सर्वसामान्य रूप देण्यामध्ये व महिलांना आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी सक्षम बनविण्यामध्ये योगदान दिले आहे. तसेच या कार्यक्रमाने आशा, अंगणवाडी कर्मचार्यांच्या आणि स्थानिक आरोग्य कर्मचार्यांच्या क्षमतांना बळ दिले आहे व त्यायोगे तळागाळातील आरोग्यसेवा परिसंस्था पुन:प्रस्थापित केली आहे.

या कार्यक्रमाच्या समाजावर पडणा-या परिणामावर आपले विचार मांडताना सब सेंटर शिंगोली, उस्मानाबादच्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. मिनाक्षी बारकुल म्हणाल्या, “जागरुकतेच्या अभावी व आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता असल्याने ग्रामीण भागातील महिला ब्रेस्ट स्क्रिनिंगसाठी पुढे येण्यास संकोच करतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून YouWeCan फाउंडेशनच्या मेडिकल टीमने संवेदनशील आणि संरचित पद्धतीने जागरुकता अभियान व तपासण्या पार पाडल्या. या तपासण्या महिला डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली केल्या जात आहेत हे महिलांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सहजपणे आपल्या चिंता मांडल्या व सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे महिलांना स्तनांच्या स्वयं-तपासणीची पद्धत तसेच वेळच्या वेळी स्क्रिनिंग करून घेण्याचे महत्त्व अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता आले. लवकरात लवकर झालेले निदान खरोखरीच संरक्षण देते हा संदेश त्यातून पुन:प्रस्थापित झाला.” अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!