धाराशिव :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याचे निश्चित झाले होते. मात्र, आमदार तानाजीराव सावंत यांनी भूम, परांडा आणि वाशी या मतदारसंघांत महायुतीशी विसंगत भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आदेश डावलून थेट काँग्रेस आणि ‘उबाठा’ गटाशी हातमिळवणी केली. महायुतीचा विश्वासघात करणाऱ्या सावंतांच्या या गंभीर कृत्याची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार केली असल्याचा हल्लाबोल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये महायुतीने पूर्ण ताकदीनिशी एकजुटीने निवडणूक लढवली. मात्र, सावंतांच्या आडमुठ्या धोरणामुळे भूम-परांडा-वाशी भागात युती होऊ शकली नाही. या गद्दारीबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी अवगत केले आहे. मतांच्या आकडेवारीतून सावंतांची ‘फिक्सिंग’ उघड झाली आहे. आमदार सावंत यांनी केवळ युती नाकारली नाही, तर महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा दावाही कुलकर्णी यांनी केला आहे. पुराव्यादाखल त्यांनी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भूम-परंडा-वाशी तालुक्यातील मतांच्या फरकाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. भूम-परांडा-वाशीतून उबाठाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती.
जिल्हा परिषद निवडणुकीत उबाठाच्या उमेदवारांना केवळ १५ हजार मते मिळाली आहेत. आमदार सावंतांनी त्यांची सगळी रसद लोकसभा निवडणुकीत उबाठाकडे वळवली व खासदार राजे निंबाळकर यांनी या निवडणुकीत त्यांची मते आमदार सावंतांच्या उमेदवाराकडे वळवली असल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा असून त्यांची छुपी युती व राजकीय वस्तुस्थिती आता जनतेसमोर उघडी पडली असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
विजयी सदस्यांना उपमुख्यमंत्री महोदयांपासून दूर ठेवले
निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ८ सदस्यांना आमदार सावंतांनी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्याऐवजी स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पक्षांतर्गत शिस्तीचा भंग करणारी असल्याचेही कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार आणि कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महायुतीचा विश्वासघात करून विरोधकांना मदत करणाऱ्या सावंतांच्या भूमिकेची सविस्तर माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. महायुतीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, जिल्ह्यातील मतदारांचा महायुतीवर असलेला विश्वास टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणीही दत्ता कुलकर्णी यांनी केली आहे. महायुतीची एकजूट टिकवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
अशी माहिती ‘bjp उस्मानाबाद’ या ईमेल वरून प्रसार माध्यमांना प्राप्त झाली आहे.
- (no title)

- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा

- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक

- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी

- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी

- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड

- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न

- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे

- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…

- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल

- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!

- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव

- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ

- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा

- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे

- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप

- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर

- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’

नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती

सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील






















