धाराशिव :
पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा, संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे. धाराशिव येथील अवघ्या सहा वर्षांच्या मायरा-फातेमा सलीम पठाण हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासत मायरा-फातेमाने पहाटेच्या सेहरीपासून संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न करता तिने हा रोजा पूर्ण केला. तिच्या या जिद्दीचे आणि श्रद्धेचे परिसरात कौतुक होत आहे.
कुटुंबियांनी सांगितले की, “मायराने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या उत्साहामुळे आणि चिकाटीमुळे आम्हालाही आनंद व अभिमान वाटतो.”
रमजान महिन्यात लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार, शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी, यासाठी मायरा-फातेमाचा हा पहिला रोजा प्रेरणादायी ठरत आहे.