केंद्रीय अर्थसंकल्प : धाराशिव जिल्ह्यासाठी गेमचेंजर , जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला नवा ‘बूस्ट’! – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love



धाराशिव : “टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई पार्क आणि तीर्थक्षेत्रांच्या कायापालटातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटनाला उभारी देणे आणि दळणवळणाची सक्षम जाळे निर्माण करण्याचे जे ध्येय आपण ठरवले होते त्याला या अर्थसंकल्पामुळे मोठी ताकद मिळाली आहे. छोट्या शहरांच्या विकासाच्या कार्यक्रमाला अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. उद्योग आणि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होईल. या अर्थसंकल्पामुळे धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. टेक्सटाईल पार्क, एमएसएमई (MSME) हब आणि तीर्थक्षेत्र विकास या त्रिसूत्रीमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध त्यातून उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.



कौडगाव एमआयडीसीमध्ये प्रस्तावित असलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कमुळे मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कापसावर जिल्ह्यातच प्रक्रिया होईल, त्यामुळे कच्च्या मालाला चांगला भाव मिळेल. उद्योगस्नेही तरतुदींमुळे गारमेंट युनिट्स आणि प्रक्रिया उद्योगात स्थानिक महिला व सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला हक्काचे काम मिळेल. एमएसएमई (MSME) पार्कसाठी अर्थसंकल्पात दहा हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात भरघोस तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वडगाव एमआयडीसीत प्रस्तावित एमएसएमई (MSME) पार्कमध्ये स्थानिक उद्योजकांना भांडवल आणि तांत्रिक बळ मिळेल.

आणि धाराशिव जिल्हा भविष्यात लघु उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

लोथल, धौलावीरा, राखीगढ़ी यांसारख्या १५ पुरातत्त्वीय स्थळांना ‘अनुभवजन्य सांस्कृतिक पर्यटन’ केंद्र म्हणून विकसित करण्याचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव म्हणजे तेर येथे आपण सुरू केलेल्या कामालाच राष्ट्रीय पातळीवर मिळालेली मान्यता आहे. तेरच्या पुरातन वारशाचे जतन, सादरीकरण आणि पर्यटनमूल्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या निर्णयामुळे अधिक बळ मिळणार असून, पर्यटनवाढ, स्थानिक रोजगारनिर्मिती, मार्गदर्शक-हस्तकला-सेवा क्षेत्राला चालना मिळणार असून तेरचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक नकाशावर ठळकपणे मांडले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘टेम्पल टाऊन’ संकल्पनेचा सर्वाधिक लाभ तीर्थक्षेत्र तुळजापूरला होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबतच दर्जेदार रस्ते, निवास व्यवस्था आणि स्वच्छता आदी पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. नॅशनल डिजिटल नॉलेज ग्रिड’च्या माध्यमातून तुळजापूर संस्थान, नळदुर्ग किल्ला आणि प्राचीन तेरच ऐतिहासिक वारसा जागतिक पातळीवर पोहचणार आहे. आय.आय.एम. (IIM) च्या सहकार्याने १० हजार पर्यटन मार्गदर्शक तयार केले जाणार आहेत. तुळजापूर, तेर, आणि येडशी येथील तरुणांना यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे धाराशिवच्या दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे. यामुळे केवळ प्रवास जलद होणार नाही, तर व्यापार आणि सेवा क्षेत्रालाही मोठी गती मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

शेती, उद्योग आणि पर्यटनाला बळकटी

नव्या पर्यटन धोरणामुळे आणि औद्योगिक तरतुदींमुळे धाराशिव जिल्हा आता केवळ एक कृषीप्रधान जिल्हा न राहता, एक महत्त्वाचे औद्योगिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे. शेती, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांतून जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि शाश्वत विकासाचे स्वप्न साकार होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!