जिल्ह्यातील महिलांना तुळजापुरात हक्काची बाजारपेठ ‘उमेद मॉल’ उभारणीस हिरवा कंदील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Spread the love

जिल्ह्यातील महिलांना तुळजापुरात हक्काची बाजारपेठ ‘उमेद मॉल’ उभारणीस हिरवा कंदील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती



तीर्थक्षेत्र तुळजापूरात उमेद मॉल सुरू करण्याच्या आपल्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी तसा शासन आदेश जारी केला आहे. तुळजापुरात ‘उमेद मॉल’ उभारल्यास जिल्ह्यातील महिला बचत गटांना स्थिर विक्री दालन उपल्ब्ध होऊन, त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. राज्यात सुरू होत असलेल्या उमेद मॉलपैकी एक तुळजापूर शहरात सुरू करावे अशी मागणी आपण १२ डिसेंबर रोजी विधान सभेत केली होती. त्याला आपल्या महायुती सरकारने मंजुरी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

उमेद मॉल’ हा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत चालवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा व यशस्वी उपक्रम आहे. हा पारंपरिक मॉल किंवा दुकान नसून, ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे व्यासपीठ आहे. उमेद मॉल म्हणजे बचत गटांच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकींनी अतिशय कष्टाने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी हकाची बाजारपेठ आहे. त्यामाध्यमातून विविध वस्तु व उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. निर्मिती करण्यात आलेल्या वस्तु व उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी “महालक्ष्मी सरस या माध्यमातून, जिल्हा व विभागस्तरावर सरस आणि विविध विकाणी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शन, तसेच आठवडी बाजारातील स्टॉलद्वारे सुध्दा महिलांना त्यांच्या वस्तु व उत्पादने विक्रीसाठी प्रोत्साहित दिले जाते. आता त्यापुढे जाऊन “उमेदमार्ट” या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती व अॅमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील गटांची नोंदणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये “उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) उभारणी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यात तुळजापूर शहरात हा उमेद मॉल साकारण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत, दर्जेदार आणि स्थिर बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य सरकारतर्फे ‘उमेद मॉल’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रारंभी राज्यातील दहा जिल्ह्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्येही ‘उमेद मॉल’ उभारण्याची मागणी आज विधानसभेत दिनांक १२ डिसेंम्बर रोजी मागणी केली होती. आई तुळजाभवानीचे पवित्र मंदिर असलेल्या तुळजापूरात वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा ठिकाणी ‘उमेद मॉल’ उभारल्यास महिला बचत गटांना स्थिर विक्री दालन मिळून त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकता येईल, असा ठाम विश्वास आपण सभागृहात व्यक्त केला होता. या संदर्भातील प्रश्नाला राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासक उत्तर दिले होत. तुळजापूरसाठी ही अत्यंत आनंददायी आणि महिला बचत गटांसाठी संधीचे नवे द्वार उघडणारी बाब ठरणार आहे. स्थानिक महिला गटांमध्येही या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली असून, मराठवाड्यात एकूण तीन मॉल मंजूर करण्यात आले आहेत त्यातील एक ‘उमेद मॉल’ तुळजापुरात उभारण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे साहेब यांचे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल जिल्ह्याच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धन्यवाद मानले आहेत.



राज्यातील सर्वोत्तम सुविधा,बचतगटांना राष्ट्रीय संधी



राज्यातील सर्वोत्कृष्ट आणि आदर्श असा मॉल उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धाराशिव जिल्ह्यातील बचतगटांसह देशभरातील विविध राज्यांतील बचतगटांना या मॉलमध्ये विक्रीसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तुळजापूर हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असून येथे दरवर्षी सुमारे दीड कोटी भाविक भेट देतात. या प्रचंड लोकसहभागाचा थेट लाभ महिला बचतगटांच्या उत्पादनांना मिळावा, त्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि आर्थिक सक्षमीकरण घडावे, यासाठीच तुळजापूर येथे ‘उमेद मॉल’ उभारण्याचा आमचा ठाम आग्रह होता.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!