अब..अबब.. शेतकऱ्याने लावला धाराशिव मध्ये 485.65 किलो अफू , कारवाई , ठाकरे सेनेच्या उपतालुका प्रमुख…!

Spread the love

अवैध अफू लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , ४८५.६५ किलो अफू झाडे जप्त



धाराशिव – वाशी तालुक्यातील मौजे दशमगाव शिवारात अवैध अफू लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अफूची झाडे जप्त केली. या कारवाईत सुमारे ४८५.६५ किलो वजनाची अफूची झाडे, अंदाजे २ लाख ४८ हजार ९७० रुपयांच्या किमतीची, जप्त करण्यात आली आहेत.



दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सर्वे क्रमांक १६३, मौजे दशमगाव येथे छापा टाकला असता कांद्याच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून अफूची लागवड केल्याचे आढळून आले. संबंधित शेत हे समाधान मनोहर उंडे (रा. दशमगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचे असल्याचे निष्पन्न झाले.ते ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.



नायब तहसीलदार व शासकीय पंचांच्या उपस्थितीत कारवाई करून पांढऱ्या-गुलाबी रंगाची फुले व मोठी बोंडे असलेली अफूची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाणे वाशी येथे गुन्हा क्रमांक ४५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) सह १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इंगळवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्शन कासार व पथकाने केली.अवैध अमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!