धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बळीराम बिभीषण चाटे, वय 34 वर्षे, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांचे शिराढोण टी पॉईंट येथील चाटे मोटार वायडिंगचे दुकानातील पत्रे ख् अज्ञात व्यक्तीने दि.15.01.2026 रोजी 21.30 ते दि. 16.01.2026 रोजी 09.30 वा. सु.खोलुन दुकानात प्रवेश करुन 250 ते 300 कि ग्रॅ जुने व नवे कॉपर वायडींग वाय अंदाजे 2,50,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम चाटे यांनी दि.17.01.2026रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (1), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-वैजनाथ बन्सी जाधवर, वय 31 वर्षे, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांचे शिराढोण शिवारातील शेत गट नं 155 मधील विहीरीमधील शक्ती कंपनीची सोलार पानबुडीअंदाजे 20,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने दि.15.01.2026 रोजी 16.00 ते दि. 16.01.2026 रोजी 11.00 वा. सु. चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैजनाथ जाधवर यांनी दि.17.01.2026रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अर्जुन शिवाजी आगळे, वय 32 वर्षे, रा. विकासनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 13 एडब्ल्यु 8591 ही दि.02.01.2026 रोजी 22.45 ते दि. 03.01.2026 रोजी 06.30 वा. सु. समर्थ नगर काबळे निवास धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अर्जुन आगळे यांनी दि.17.01.2026रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-लहु सुनिल कोळेकर, वय 32 वर्षे, रा. काक्रंबावाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 4045 ही दि.31.12.2025 रोजी 22.00 ते 22.15 वा. सु. करजखेडा येथील अन्नछत्रा समोरील रस्त्यावरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लहु कोळेकर यांनी दि.17.01.2026रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.