नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

Spread the love


जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे – चेअरमन नानासाहेब पाटील

धाराशिव –
धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा एन.व्ही.पी.शुगर परिवाराने सुरू केली आहे. यंदाच्या गळीत हंगामात देखील गाळपास आलेल्या 63,090 मे.टन ऊसाचे बिल अवघ्या पंधरा दिवसात पहिला हप्ता प्रतिटन 2500/- रूपये प्रमाणे संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी दिली आहे.

आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2026 रोजी 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी आणि जनता सहकारी बँकेतील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. 

गळीत हंगाम संपल्यावर कारखान्याचा मागील दोन वर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्याना योग्य असा ऊस भाव देण्याची परंपरा एनव्हीपी  शुगर परिवार कायम ठेवणार आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन नानासाहेब पाटील यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!