आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडोळी येथे शिवसेना UBT ची आढावा व नियोजन बैठक

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी
पाडोळी (आ), ता. धाराशिव येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा व नियोजन बैठक आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, बूथनिहाय आढावा, संघटनात्मक मजबुती तसेच प्रभावी प्रचारयंत्रणा उभारण्यावर सविस्तर व ठोस चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथवर सक्षम आणि जबाबदार टीम उभी करून मतदारांशी थेट संवाद वाढवण्यावर भर देण्यात आला.


कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकजुटीने, समन्वयाने व शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारक म्हणून मैदानात उतरावे. शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी यावेळी केले.


या बैठकीस पाडोळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!